वैयक्तिक एकट्याचे खाते किंवा दोन/त्यापेक्षा अधिक व्यक्तींचे संयुक्त खाते. अज्ञानाच्या वतीने अज्ञान पालक कर्ता खाते उघडू शकेल. प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, ट्रस्ट, कंपनी, सहकारी सोसायटी बँकेत खाते उघडू शकतील. काटकसर फंडासाठी बँकेचा सभासद असणे आवश्यक आहे.
(सहकारी सोसायटीचा ठराव, संस्थेचे नोंदणीपत्र, पॅन नंबर घेणे आवश्यक आहे.)
बँकेच्या मंजूर KYC (Know Your Customer) पॉलिसीला अधीन राहून सर्व खातेदारांची खाते उघडण्यासाठी KYC च्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यानुसार, नजीकच्या काळातील फोटो, निवासाचा पुरावा (आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स, बँक पासबुक, पासपोर्ट इ. ची झेरॉक्स) सह पॅनकार्डची झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड करून देणे आवश्यक आहे.
आमच्या बँकेत खातेदारांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह लॉकर सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे, आणि दागदागिने सुरक्षितपणे ठेवता येतात.
| लॉकरचे प्रकार | वार्षिक भाडे |
|---|---|
| A | 600 |
| B | 700 |
| C | 900 |
| D | 1200 |
| E | 1800 |