कार्यालयीन वेळ

सोम-शुक्र:-१०:३० am - १:०० pm व २:०० pm - ५:३० pm
सुट्टी: प्रत्येक रविवारी, तसेच दुसऱ्या व चौथ्या शनिवारी
कर्जाची माहिती

A) जामिनकी कर्ज

जामिनकी कर्ज, धार्मिक समारंभ वा कौटुंबिक अडचणी, कर्जफेड, आजारपण इत्यादी वैयक्तिक कारणासाठी कर्ज मंजूर करण्यात येईल.

सभासदत्वाच्या कालावधीनुसार पगाराच्या पटीची मर्यादा आवश्यक जामिनदार कमाल मर्यादा भाग आवश्यक कर्ज देताना शिल्लक आवश्यक वर्गणी कर्जफेड मुदत (महिने)
१ ते १२ महीने १५ पट १० लाख ५०,००० २५,००० १०८
१२ महिनेपेक्षा जास्त ३० पट १५ लाख ५०,००० ५०,००० १०८

शिल्लक सेवाकाळाचा विचार करून कर्ज रक्कम व कर्ज हप्ता निश्चित केला जाईल.

कोणत्याही सभासदास जामिनकी कर्जास दोन सभासद जामीनदार म्हणून आवश्यक आहेत. कोणत्याही सभासदास दोनपेक्षा अधिक सभासदास जामिनदार म्हणून राहता येणार नाही. तसेच परस्पर एकमेकांना जामिन म्हणून राहता येईल.

सभासदास त्याच्या गरजेनुसार केव्हाही कर्ज रिन्यूअल करता येईल.

कर्जाची परतफेड सेवा निवृत्तीच्या एक महिन्यापूर्वी होईल अशा मुदतीतच जामिनकी कर्ज मंजूर करण्यात येईल अथवा जामिन म्हणून स्विकारण्यात येईल. इतर बाबतीत जामिनदाराची किमान तीन वर्षे नोकरी शिल्लक असली पाहिजे अथवा जामिनदाराने स्वेच्छेने लेखी संमती दिल्यास त्याचा जामिन स्विकारण्यात येईल.

एकूण मंजूर कर्ज रक्कमेवर कर्ज धोरणानुसार दर हजारी रु. १/- याप्रमाणे हाताळणी फि कर्जातून वसूल केली जाईल.

B) काटकसर फंड तारण कर्ज

ज्या सभासदाने जामीनकीच्या तारणावर व हमी तारण योजनेतील कर्ज घेतलेले नसेल त्यास रिझर्व्ह बँकेच्या आदेशास पात्र राहून संचालक मंडळ ठरविल त्या ठेवीच्या कर्जाच्या मर्यादा प्रमाणे स्वतःचे जमा असलेल्या वर्गाणीच्या तारणावर रक्कम कर्जाऊ देण्यात येईल. सदर कर्जाची फेड ५८ हप्त्यात वसूल करण्यात येईल. सदर कर्जावर काटकसर फंडावर दिले जाणाऱ्या व्याजापेक्षा २% अधिक व्याज आकारण्यात येईल.

पगारदार नोकरवर्गाची बँक असल्याने सभासदास काटकसर फंड (संचित ठेव) दरमहा रुपये १०००/- पगारातून कपात करून द्यावी लागेल.

एखाद्या सभासदाचे अत्यंत अडचणीचे वेळी उदाहरणार्थ आजारपणाकरीता तो कर्जदार नसल्यास व कोणास जामीनदार नसल्यास त्यास बँकेचे वरिष्ठ अधिकारी जमा रकमेच्या ७५% रक्कम परत करू शकतील.